Adobe aftereffects basics for beginners in marathi episode 01 introduction


शुभेच्छा!!!

दीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ!!!


ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस

मागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते,  तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 प्रमुख डिपार्टमेंट म्हणजे –
प्री प्रोडक्शन
प्रोडक्शन
पोस्ट प्रोडक्शन
हि 3 डिपार्टमेंट मध्ये अजून काही लहान लहान डिपार्टमेंट असतात. ती कोण कोणती ते आपण समजून घेऊ या.

प्री प्रोडक्शन
म्हणजे अगदी सध्या सरळ शब्दांत म्हटले तर प्लॅनिंग ( planing ). जसे एखादे घर बांधायचे असेल तर आधी त्याचा प्लॅन (plan)  बनवला जातो आणि मग बांधकामाला सुरुवात करतात अगदी तसे. प्री प्रोडक्शन ह्या डिपार्टमेंट मध्ये बरेच छोटे डिपार्टमेंट असतात.

प्री प्रोडक्शन :
कॉनसेप्ट डेव्हलपमेंट
स्टोरी बिल्डिंग
स्क्रीन प्ले ( पटकथा )
स्क्रीन रायटिंग
स्टोरीबोर्ड
कॅरॅक्टर ङिझाईन
बॅकग्राउंड ङिझाईन
टेक्श्चर  ङिझाईन

प्रोडक्शन :
ह्या सर्व डिपार्टमेंट मधून तयार झालेले वर्क पुढील डिपार्टमेंट  मध्ये पाठवले जाते ते म्हणजे प्रोडक्शन.
प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणजे प्रत्यक्षात तयार झालेल्या प्लॅन वर काम करणे. ह्या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा बरेच छोटे छोटे डिपार्टमेंट मधून काम केले जाते.

प्रोडक्शन डिपार्टमेंट :
मॉडेलिंग डिपार्टमेंट
टेक्श्चरिंग डिपार्टमेंट
लायटिंग डिपार्टमेंट
रिगिंग डिपार्टमेंट
स्कीनिंग डिपार्टमेंट
ॲनिमेशन डिपार्टमेंट
रेंडरिंग डिपार्टमेंट

पोस्ट प्रोडक्शन :
हे शेवटचे पण तितकेच महत्वाचे डिपार्टमेंट. या डिपार्टमेंट मध्ये फिनिशिंगचे काम केले जाते. फिल्म कशी सुंदर आकर्षित केली जाईल याची काळजी या पोस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये घेतली जाते.
ह्या डिपार्टमेंट मध्ये

पोस्ट प्रोडक्शन :
कंपोजीटिंग डिपार्टमेंट
एडीटिंग डिपार्टमेंट
साउंड डिपार्टमेंट

असे काही महत्वपूर्ण डिपार्टमेंट असतात.


ॲनिमेशन (Animation) म्हणजे काय? ……

जर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो.
खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते.
ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे मोशन पिक्चर किंवा वीडियो प्रोग्रॅम होय. ॲनिमेशन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपण त्याबद्दल थोडे जाणून घेणार आहोत.

ॲनिमेशन करण्याच्या पद्धती (टेक्नीक्स) :-

  • क्लास्सिक ॲनिमेशन
    1. स्टाइलाईझ ॲनिमेशन
    2. रोटोस्कोपिंग ॲनिमेशन
    3. लाइव्ह एक्शन ॲनिमेशन
  • स्टॉपमोशन ॲनिमेशन
    1. पपेट ॲनिमेशन
    2. क्ले ॲनिमेशन
    3. कटाऊट ॲनिमेशन
    4. सिलहाऊट ॲनिमेशन
    5. मॉडेल ॲनिमेशन
    6. ओब्जेक्ट ॲनिमेशन
    7. ग्राफिक ॲनिमेशन
    8. सॅन्ड ॲनिमेशन
    9. फ्लिपबुक ॲनिमेशन
  • कंप्यूटर ॲनिमेशन
    1. २डी ॲनिमेशन
    2. ३डी ॲनिमेशन
    3. स्पेशल एफेक्ट्स ॲनिमेशन